पिंपरी महापालिका दिव्यांगाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य देणार

 


पिंपरी : महापालिकेच्या ताब्यात येणाऱ्या जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात शंभू सृष्टी उभारण्यासाठी आणि इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच दिव्यांगाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य देणे अशी नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजूरी दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मामुर्डी येथील वीरबाबा चौक ते मामुर्डी गावठाणपर्यंत मंजूर विकास योजनेतील १८ मी. रस्त्याने बाधित जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील नागेश्वर नगर, गायकवाड वस्ती उर्वरित परिसरातील रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुना डिस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन यांच्या विविध क्रिडा स्पर्धांना सन २०२३-२४ करिता महापालिकेच्या वतीने आर्थिक पुरस्कार देण्यासाठी आर्थिक सहाय्य अदा करण्यासाठी तसेच महापालिकेच्या होली, कासारवाडी, पिंपळे निलख, सांगवी व दापोडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्र व मैलापाणी पंप हाऊसमधील मशीनरीज, उपकरणे ऊर्जा परिक्षण अहवालानुसार ऊर्जा बचतकामी व आवश्यकतेनुसार बदलण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ बोपखेल येथील पश्चित भागातील रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. २० येथील शरयू मोटर्स ते हॉकी स्टेडियम पर्यंतचा नाला विकसीत करण्यासाठी आणि महापालिकेमार्फत खोदण्यात आलेल्या चरांची दुरूस्ती करण्यासाठी व आवश्यकतेनुसार पँचवर्क पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. २८ रहाटणी व पिंपळे सौदागर येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. २९ रहाटणी पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी आणि प्रभाग क्र. ३ मोशी डुडूळगाव व इतर परिसरातील रस्त्यांचे सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

सन २०२३-२४ करिता सांगवी मधील परिसरातील, महापालिकेच्या प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण भागातील से.२८ आकुर्डी गावठाण व इतर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण भागातील से. २८ आकुर्डी गावठाण व इतर परिसरात डांबरीकरण करण्यासाठी आणि प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण भागातील से. २७, से. २७ अ व इतर परिसरात डांबरी रस्त्यांची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सन २०२३-२४ करिता  किवळे, मामुर्डी गावठाण व लगतच्या परिसरामध्ये जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी तसेच चिंचवड मतदार संघातील प्रभाग क्र. २३ स.नं. ९ थेरगाव येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी तसेच नवीन तालेरा रुग्णालयातील इमारतीमध्ये आवश्यक स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिकेच्या प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. ११ मधील शिवतेजनगर परिसरात नवीन स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व इतर आवश्यक कामे करण्यासाठी तसेच क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ८ व ९ मध्ये औष्णिक धुरीकरण करण्यासाठी फॉग वॅन मशिन ठेवून कामकाज करण्यासाठी आवश्यक डिझेलवर चालणारे तीन चाकी रिक्षा टेम्पो वाहनचालकासह भाड्याने देण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपरी महापालिका दिव्यांगाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य देणार पिंपरी महापालिका दिव्यांगाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य  देणार Reviewed by ANN news network on ३/०२/२०२४ ०१:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".