विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील खोपटे - धसाखोशी येथील निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ जानबा ठाकूर (८८)यांचे पनवेल,कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुलगे,सुना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.अतिशय संयमी आणि प्रेमळ स्वभाव असललेले पंढरीनाथ पाटील यांनी रायगड जिल्ह्यात १९६३पासून रायगड जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या ज्ञानदानातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत गरीब - गरजू विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यासह पनवेल तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतांना विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.तर १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात अतिशय दुर्गम अशा रायगड जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या पोलादपूर तालुक्यात मुख्याध्यापक पदावर आपलेपणाने शिक्षण सेवा केली.त्यांच्या पार्थिवावर खोपटे - धसाखोशी येथील स्म्शानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.तर सांत्वनासाठी येणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा दुखावटा आणू नये असे आवाहन त्यांचे चिरंजीव तथा उरण तालुक्यातील जन चळवळीचे कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी केले आहे.
खोपटे येथील निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ ठाकूर यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: