विठ्ठल ममताबादे
उरण : ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांची घरपट्टी वसुली कामे जप्ती प्रक्रिया करण्यात आली.यावेळी आर.के .लॉजिस्टिकस यार्डला टाळे मारून जप्ती करण्यात आली . जप्तीची कारवाई करताच आर के लॉजिस्टिक व्यवस्थापनाने ५ लाख रुपयाचा कर भरला व उर्वरित कर काही दिवसात ग्रामपंचायतला भरणार असे सांगितले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष घरत,उपसरपंच माई पाटील , ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर ,ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत, सुदर्शन पाटील ,रामकिशोर ठाकूर, विनायक पाटील, आनंद म्हात्रे, वीणा घरत, सुलोचना घरत, अश्विनी नाईक, हर्षदा तांडेल, सृष्टी म्हात्रे, जयश्री घरत, प्रतिक्षा म्हात्रे व नागरिक उपस्थित होते .
कर थकविला म्हणून जासई ग्रूप ग्रामपंचायतीने आर के लॉजिस्टिक यार्डवर केली जप्तीची कारवाई
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२४ ०९:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: