पुणे:पं.दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानतर्फे पं. श्रीकृष्ण जकातदार यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर आणि लेखिका डॉ. चंद्रकला जोशी यांना ' मंदाश्री ' पुरस्कार डॉ.वा.ल.मंजुळ यांच्याहस्ते देण्यात आला. साहित्य परिषदेत नुकताच हा कार्यक्रम पार पडला.ज्येष्ठ लेखक अरविंद गोखले, प्रतिभा मोडक, चंद्रकांत शेवाळे, दादासाहेब जकातदार, विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार उपस्थित होते. पल्लवी जकातदार यांनी सूत्रसंचालन केले.
ज्योतिषाची भूमिका खेळाडूसारखीच : सिध्देश्वर मारटकर
सत्काराला उत्तर देताना मारटकर यांनी सांगितले की ज्या प्रमाणे मोठ्या कलाकाराचे प्रत्येक चित्रपट यशस्वी होत नाही किंवा मोठा खेळाडू प्रत्येक सामना जिंकू शकत नाही त्याप्रमाणे कोणत्याही ज्योतिर्विदांचे प्रत्येक भाकीत अचूक ठरत नाही त्यांनाही मर्यादा असून ज्योतिषी म्हणजे ब्रह्मदेव नाही ही वस्तुस्थिती समाजानी व ज्योतिर्विदानी सुद्धा स्वीकारायला हवी.
जास्तीत जास्त अचूक भाकिते वर्तविण्यासाठी ज्योतिष एक साधना समजून अभ्यास करणे गरजेचे आहे.
२००१ साली मिळालेला प्रतिष्ठेचा शाहू मोडक स्मृती पुरस्कार चांगले काम करावे यासाठी मिळाला होता तर आजचा प्रतिष्ठेचा मंदाश्री पुरस्कार चांगले काम केले म्हणून मिळाला असे समजतो.या पुरस्कारासाठी माझ्यावर आपण जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल जकातदार परिवार व प्रतिष्ठानचे विश्वस्त यांचेप्रति आभार व्यक्त करतो.आजवर मिळालेल्या यशामागे कठीण प्रसंगी माझ्यामागे खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या प्रतिभाताई मोडक व विजय जकातदार , वा.ल.मंजूळ यांचे या प्रसंगी आभार व्यक्त करतो
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२४ १२:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: