राहुल कलाटे यांच्या प्रयत्नांमुळे वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंग्टन हॉल साकारणार; आज भूमिपूजन!
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंग्टन हॉल उभारला जाणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पाचे आज ९ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना कलाटे म्हणाले, या बॅडमिंग्टन हॉलमुळे परीसरतील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्टचा अनुभव घेता येणार आहे. शहरातील नव्या पिढीत चांगले खेळाडू घडावे म्हणून उभारला जाणारा हा हॉल सर्व बॅडमिंग्टन खेळाडूंना उपयोगी ठरणार आहे.यासाठी मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आज प्रत्यक्षात कामास सुरवात होत आहे ही वाकड मधील रहिवासी व खेळाडूंसाठी आनंदाची बाब आहे. या प्रकल्पासाठी प्रयत्न करण्याऱ्या सर्वांचेच हे यश आहे. या प्रकल्पाचे नियोजन करताना मागील २ वर्षापासून प्रयत्न करणारे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील व विद्यमान आयुक्त शेखर सिंह तसेच प्रशासन, वास्तुविशारद शशी प्रभू अँड असोसिएट्स, मनपा अधिकारी, कर्मचारी या सर्वाचेच मी परिसरातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. हा प्रकल्प साकारत असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२४ ०४:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: