विठ्ठल ममताबादे
उरण : बसचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जुईनगर, नवी मुंबई येथून आलेल्या एन. एम. एम. टी. बसने उरण तालुक्यातील खोपटा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांना व टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नवीमुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन चालकावर व संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान उरण विधानसभा मतदारसंघांचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.या झालेल्या अपघात पाच मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावले असले तरी दोन मोटारसायकलस्वारांना बसने फरफटत नेले. या अपघात निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे.तर केशव ठाकूर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तर बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघातातेल मयत, जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी सरपंच विशाखा ठाकूर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, बीजेपी कार्यकर्ता प्रशांतठाकूर, खोपटा गाव अध्यक्ष निलेश भगत, उपसरपंच रितेश ठाकूर, माजी उपसरपंच सुजित म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकूर, देवेंद्र पाटील,प्रदीप ठाकूर,नवनाथ ठाकूर,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे यांनी या वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खोपटा चिरनेर कोप्रोली या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स बसवावेत. योग्य ठिकाणी गतिरोधक हवेत. प्रत्येक कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी वाहने व्यवस्थित पास होतात की नाही याची काळजी घ्यावी. खोपटे कोप्रोली चिरनेर मार्गावर सुरक्षारक्षक नेमावेत. वाहने येण्यासाठी व वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा. रस्ता चार पदरी करावा.पोलीसांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.अशा मागण्या नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२४ १२:४०:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: