शरद पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपनीला सीरम इन्स्टिट्यूटकडून मिळाले ४३५ कोटी रुपये; किरिट सोमय्या यांचा आरोप

 

हे कोविशिल्ड लसीचे कमिशन आहे का? असा प्रश्न केला उपस्थित

पिंपरी : शरद पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपनीला कोविड व्हॅक्सिन तयार करणार्‍या कंपनीकडून ४३५ कोटी रुपये देण्यात आले असून हा व्यवहार संशयास्पद आहे.असा आरोप भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज दि. १५ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना केला.

या प्रकरणाची कागदपत्रे मिळविण्यासाठी सोमय्या आज पिंपरी चिंचवडमधील कंपनी रजिस्ट्रार कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.

सोमय्या म्हणाले; पैसे कसे ढापायचे हे शरद पवार परिवार जगाला शिकवू शकतो.सगळे जग कोविडमुळे घाबरलेले. असताना वसुलीचा धंदा सुरू होता. न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मागील १२ वर्षात दमडीचा कारभार नसताना अचानक मार्च २०२१ मध्ये या कंपनीच्या खात्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कोविडची लस बनविणार्‍या कंपनीच्या खात्यातून ४३५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.हे कोविशिल्ड ल्सीचे कमिशन आहे का? या कंपनीच्या प्रवर्तकाचे कॉन्ट्रिब्युशन अवघे १ लाख आहे. हा व्यवहार संशयास्पद आहे.मी आज या प्रकरणाची कागदपत्रे घेऊन उद्या दिल्लीला जाणार आहे. आणि, या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे.


सोमय्या यांचे हे आरोप खळबळजनक आहेत. राजकीय वर्तुळात यामुळे मोठी उलथापालथ संभवते.दरम्यान आता सोमय्यांना पुढे करून भाजप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला संपविण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.

शरद पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपनीला सीरम इन्स्टिट्यूटकडून मिळाले ४३५ कोटी रुपये; किरिट सोमय्या यांचा आरोप शरद पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपनीला सीरम इन्स्टिट्यूटकडून मिळाले ४३५ कोटी रुपये; किरिट सोमय्या यांचा आरोप Reviewed by ANN news network on १/१५/२०२४ ०८:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".