गणपतीपुळे मंदिर प्रांगणात साफसफाई करून कोकण विभागीय आयुक्तांनी केला महास्वच्छता मोहिमेचा प्रारंभ (VIDEO)

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गणपतीपुळे येथील श्री. क्षेत्र गणपती मंदिर परिसराची स्वच्छता करत कोकण विभागातील महा स्वच्छता अभियानांतर्गत मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेचा आज मकर संक्राती दिनी प्रारंभ केला. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह गणपती मंदिर संस्थानचे सरपंच प्रा. विनायक राऊत, स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा यात प्रमुख सहभाग होता. 

     आज सकाळी गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्याची प्रथम स्वच्छता करण्यात आली. बचत गटाच्या महिला,  आपदा मित्र, स्वामी बाळ सत्यधारी महाराज अध्यात्म केंद्र खेडशीचे  अनुयायी, गणपतीपुळेचे ग्रामस्थ, उपसरपंचसंजय माने, ग्राम पंचायत सदस्य, प्रांताधिकरी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, राहूल पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलीस दलाचे कर्मचारी, जे एस डब्ल्यूचे अधिकारी- कर्मचारी यांचा सहभाग होता.

       यानंतर गणपती मंदिर परिसराची स्वच्छता आयुक्त डॉ. कल्याणकर, जिल्हाधिकारी श्री.सिंह, पोलीस अधिक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार, प्रशिक्षणार्थी आय ए एस डॉ जस्मीन, विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली.

      यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वाचे आभार मानून डॉ. कल्याणकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी कालच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन मंदिर परिसर स्वच्छता करण्याबाबत आवाहन केले होते. जवळ-जवळ सात जिल्ह्यातील प्रतिनिधी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इथे जमा होते. महा स्वच्छता अभियांनार्तगत डीप क्लीनींग ड्राईव्ह गणपतीपुळे येथून सूरु केले असून, जिल्ह्यात सर्वत्र राबवू.

     जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी काल बैठक घेऊन घेवून, आवाहन केले होते. त्याला तात्काळ प्रतिसाद देत या मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ आज मकर संक्रांती दिनानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिर परिसराची स्वच्छता करुन  केली आहे.

गणपतीपुळे मंदिर प्रांगणात साफसफाई करून कोकण विभागीय आयुक्तांनी केला महास्वच्छता मोहिमेचा प्रारंभ (VIDEO) गणपतीपुळे मंदिर प्रांगणात साफसफाई करून कोकण विभागीय आयुक्तांनी केला महास्वच्छता मोहिमेचा प्रारंभ (VIDEO) Reviewed by ANN news network on १/१५/२०२४ ०८:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".