पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व पक्षांच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा मेळावा पुणे येथे पार पडला.युतीच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
पुण्यातील म्हात्रेपूल डी.पी. रस्त्यावर असलेल्या शुभारंभ लॉन्स येथे पार पडलेल्या या मेळाव्यास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) शिवसंग्राम संघटना आदी पक्ष, संघटनांचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे, सिद्धार्थ शिरोळे, दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले, प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर, शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड, शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व नेत्यांनी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार मेळाव्यात केला. यासाठी पक्षबांधणी, जनसंपर्क वाढविण्यावर एकमत झाले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आयचे ॲड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
१/१५/२०२४ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: