पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे पुण्यात १ ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च, गांधी दर्शन शिबीर असे विविध कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत.
गांधी सप्ताह आयोजनाचे हे १२ वे वर्ष आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर,शहराध्यक्ष सचिन पांडुळे,अप्पा अनारसे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत.
१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. १० ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता गांधी पुतळा गांधी भवन ते गोखले पुतळा (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) या मार्गावर 'शांती मार्च' काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'आज यदि गांधी होते तो ' या विषयावर डॉ मणिंद्रनाथ ठाकूर (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'लोकसभा निवडणुका :आव्हाने आणि पर्याय ' या विषयावर परिसंवाद होणार आहे.त्यात पत्रकार विजय चोरमारे आणि श्रीराम पवार तसेच अभिनेते किरण माने आदी सहभागी होणार आहेत.
५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांचे 'आजचे वर्तमान आणि आव्हाने ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांचे 'गांधी समजून घेताना ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अविष्कार निर्मित 'उमगलेले गांधी' हा अभिवाचनाचा प्रयोग होणार आहे.त्यात दिलीप प्रभावळकर,सुहिता थत्ते,धनश्री करमरकर,दीपक राजाध्यक्ष सहभागी होणार आहेत.
८ ऑक्टोबर रोजी गांधी दर्शन शिबीर होणार असून त्यात माजी न्या.सत्यरंजन धर्माधिकारी,डॉ कुमार सप्तर्षी,डॉ.शैलजा बरूरे मार्गदर्शन करणार आहेत.
१ ऑक्टोबर रोजी पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी सप्ताहाचे उदघाटन
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२३ ०२:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: