मिरवणुकीद्वारे देणार शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणाचे संदेश
पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने शनीवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी ‘हजरत महमद पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद)निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी 'चे कुलपती डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होऊन मिरवणुकीस प्रारंभ होईल.
हजरत महमद पैगंबरांच्या संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण असेल. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख,संस्थेचे संलग्न पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज मार्गे आझम कॅम्पस गेट येथे मिरवणुकीची सांगता होईल.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १९ वे वर्ष आहे.
३० सप्टेंबर रोजी पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२३ ०९:३६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: