पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाची जय्यत तयारी : शेखर सिंह

 


पिंपरी :  गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर गणेश मंडळांसाठी तसेच नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या  आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच इतर घाटांवरही जीवरक्षकअग्निशमन दलआपत्ती व्यवस्थापन आणि  सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेतअशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणाचे रक्षण करत सुरक्षित व उत्साहाच्या वातावरणात पार पडावी यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत.  काळेवाडी मधील स्मशान घाट,निगडी प्राधिकरणातील गणेश तलावचिखली स्मशान घाटपिंपळे गुरव घाटवाकड गावठाण घाटमोशी नदी घाटथेरगाव पूल नदी घाटवाल्हेकरवाडी मधील जाधव घाटसुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्यऔषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह  वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. या वैद्यकीय पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारीस्टाफ  नर्सब्रदरवॉर्ड बॉयरुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या नवव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी म्हणजेच म्हणजेच दि. २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर या कालावधीत विसर्जन घाटांवर  वैद्यकीय पथक कार्यरत राहीलअशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.

स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन केले जात असून महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत, तसेच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील २६ विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेटरिंगगळबोटमेगा फोनदोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून संबधित गणेश विसर्जन घाटांवर आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाची जय्यत तयारी : शेखर सिंह पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाची जय्यत तयारी : शेखर सिंह Reviewed by ANN news network on ९/२७/२०२३ ०९:४१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".