वेस्टसाइडने २५ स्टोर्समध्ये सुरु केले 'वेसनेस' जीवनशैली आणि कल्याण यांची नवी व्याख्या रचणारा उपक्रम 'वेसनेस'
पुणे : भारतातील आघाडीची आणि वेगाने वाढत असलेली एक रिटेल शृंखला, वेस्टसाइडने एक नवा रोमांचक उपक्रम 'वेसनेस' सुरु करण्यासाठी, देशातील पहिला एकात्मिक हार्ट-फिटनेस प्लॅटफॉर्म फिटपेजसोबत सहयोग केला आहे. अतिशय अनोखा फिटनेस उपक्रम, 'वेसनेस' चा उद्देश जीवनाचे कल्याण केंद्रीभूत मानून जीवनशैलीची नवी व्याख्या रचणे हा आहे.
वेस्टसाइडच्या फॅशन परंपरेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ, देशभरात २५ वेस्टसाइड स्टोर्समध्ये वेसनेस सेशन आयोजित केले जातील. वेस्टसाइडसाठी हा खूपच महत्त्वाचा टप्पा आहे कारण या उपक्रमामुळे वेस्टसाइड हा सर्वसमावेशक जीवन कल्याण आणि समुदाय निर्माणच्या दिशेने वाटचाल करणारा पहिला ब्रँड बनला आहे.
दर महिन्याला वेसनेसअंतर्गत योग, झुम्बा आणि वॉक अँड रन सेशन्स आयोजित केली जातील. प्रत्येक प्रोग्राम एक महिनाभर चालेल आणि आठवड्यातून तीनदा सेशन घेतली जातील. दर महिन्याला फक्त ५९५ रुपये नाममात्र फी भरून कोणीही व्यक्ती अगदी सहजपणे या सेशन्ससाठी नोंदणी करून १२ फिटनेस सेशन्सचा लाभ घेऊ शकेल. २ सप्टेंबर २०२३ पर्यंत ५०० पेक्षा जास्त लोकांनी वेसनेससाठी नोंदणी केलेली होती. दिल्ली, मुंबई, सुरत, चंदिगढ, चेन्नई, गाजियाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे, बंगलोर, गुरगाव, विजयवाडा, विझाग, गुवाहाटी, डेहराडून, सोलापूर आणि थ्रिसूर या १७ शहरांमधील वेस्टसाइड स्टोर्समध्ये ही सेशन्स आयोजित केली जातील.
जीवन कल्याण आणि समुदाय निर्माण यांच्याप्रती वेस्टसाइडने नेहमीच बांधिलकी जपली आहे. आपल्या स्टोर्समध्ये फिटनेस आणि वेलनेस ऍक्टिव्हिटीज चालवून वेस्टसाइड अधिक निरोगी व सक्रिय समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत आहे. फॅशन-फॉरवर्ड कपडे उपलब्ध करवून देण्याबरोबरीनेच आपल्या ग्राहकांचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी व समृद्ध बनवण्याच्या वेस्टसाइडच्या मिशनला साजेसा असा हा उपक्रम आहे.
ब्युटी अँड कस्टमरचे प्रमुख श्री उमाशन नायडू यांनी या उपक्रमाविषयी सांगितले, "वेस्टस्टाईलक्लब या सीझनमध्ये ग्राहकांना एक नवा लाभ प्रदान करत आहे. आमच्या ग्राहकांना योग, झुम्बा, वॉक अँड रनचा आनंद अगदी सहजपणे घेता यावा यासाठी आम्ही फिटपेजसोबत हातमिळवणी केली आहे. आम्ही देशभरात आमची पोहोच वाढवत आहोत, आणि त्याचा उपयोग जीवन कल्याणाची प्रेरणा देण्यासाठी व आपल्या ग्राहकांसाठी एक सुरक्षित समुदाय निर्माण करण्यासाठी देखील करण्याची आमची इच्छा आहे. दर आठवड्याला नवी फॅशन प्रस्तुत करण्यापासून ते आनंद व पोषण यांनी परिपूर्ण, निरोगी जीवनशैली प्रदान करणे देखील आमच्या ब्रँडच्या स्टायलिश प्रयत्नांचा एक भाग आहे. अशाप्रकारच्या उपक्रमांमधून आम्ही लोकांना पुढे नेऊ इच्छितो आणि एक असे वातावरण निर्माण करू इच्छितो ज्यामध्ये एकसमान विचारांचे लोक एकत्र येऊ शकतील."
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी प्रोत्साहन देणारे तज्ञ म्हणून फिटपेज हे या उपक्रमासाठी सर्वोत्तम भागीदार आहेत.
फिटपेजचे संस्थापक व सीईओ श्री. विकास सिंह यांनी सांगितले, "फिटपेजने नेहमीच विज्ञानावर आधारित पद्धतशीर दृष्टिकोनामार्फत आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन दिले आहे. आमच्यासाठी वेसनेस एक असा उपक्रम आहे ज्यामध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये सक्रिय जीवनशैली विकसित करू शकू, त्यांना स्वतःचे अधिक निरोगी व्हर्जन मिळवून देऊ शकू आणि अशाप्रकारे पुढे जात नजीकच्या भविष्यकाळात निरोगी समुदाय निर्माण करू शकू. आम्ही असे मानतो की, कल्याण म्हणजे जीवनात अजून जास्त काही निर्माण करणे नसून, कल्याण हीच जीवनशैली आहे. आणि हाच विचार आम्ही वेसनेसच्या माध्यमातून पुढे नेत आहोत."
आपल्या जवळच्या वेस्टसाइड स्टोरमध्ये जाऊन फॅशन व फिटनेस यांच्या मिलापाचा अनुभव अवश्य घ्या.
Reviewed by ANN news network
on
९/२९/२०२३ १०:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: