पुणे : मागील अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येत आहे, तसेच त्याविषयी प्रशासनाला निवेदनही दिले जाते. या वर्षीही हिंदु जनजागृती समितीने भाविकांनी धर्मशास्त्रासुनार श्रीगणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे यांसाठी 28 सप्टेंबर या दिवशी पुणे शहरात ओंकारेश्वर घाट, एस्.एम्. जोशी पूल या ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते नदीच्या घाटावर हातात प्रबोधन करणारे फलक घेऊन थांबले होते. हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या या मोहिमेमुळे जवळपास सर्व विसर्जन घाटांवर गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासच प्राधान्य दिल्याचे चित्र होते. कृत्रिम हौदामध्ये विसर्जन, मूर्तीदान यांसारख्या उपक्रमांकडे भाविकांनी पाठ फिरवल्यामुळे समाजाचा कल धर्माचरणाकडेच असल्याचे दिसून आले.
ओंकारेश्वर घाट येथे नदीपात्राकडे जाणारा रस्ता पटल ठेवून बंद केल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर ओंकारेश्वर घाट येथील नदिपात्राकडे जाणारा बंद केलेला रस्ता पटल काढून पूर्ववत चालू करण्यात आला. नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जन करू नका असे पालिकेने आवाहन केले होते. एस.एम.जोशी पुल येथील घाटावर नदी पात्रात जाता येऊ नये म्हणून बांबू आडवे बांधून रस्ता बंद केला होता. निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेली ट्रॉली अस्वच्छ होती, कचऱ्याची घाण तशीच ट्रॉलीमधे होती त्यातच निर्माल्य टाकण्यात येत होते.
महापालिकेने जय्यत तयारी केली असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात दर वर्षी प्रमाणे ढिसाळ नियोजन असल्याचेच दिसून आले
Reviewed by ANN news network
on
९/२९/२०२३ ०५:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: