इंदापूर तालुक्यातील कुंभारगावच्या "क्रांती मित्र मंडळाचा" गणरायाला भावपूर्ण निरोप (VIDEO)

 



अनेक समाजोपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा

गणेश मिंड
भिगवण : इंदापूर, जि.पुणे  तालुक्यातील पक्षी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगांवातील क्रांती मित्र मंडळाची एक वेगळीच ओळख आहे. आतापर्यंत मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले आहेत. विविध माध्यमांद्वारे त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुकही झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव येथील "क्रांती मित्र मंडळाची" स्थापना सन २००० मध्ये झाली असून आतापर्यंत २००० ते २०२३ या सर्व कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या स्वखर्चातून म्हणजेच  मंडळाच्या देणगी खर्चातून मोलाची समाजिक कार्य केलेली आहेत. एखाद्याच्या अडचणी काळामध्ये मदतीचा हात पुढे केला आहे.

 समाजकार्य करत असताना गावांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिरे तसेच गरज असेल तिथे पिण्याच्या पाण्याचे बोरवेल आणि गावातील शाळेसाठी लागणारी मदतही आणि आपल्या स्वखर्चाने केली आहे. तसेच गावाच्या विकासासाठी कार्यक्रम घेण्याबरोबरच महाराष्ट्रात आलेल्या आकस्मित आपत्ती व्यवस्थापनात सुद्धा हिरीरीने भाग घेऊन सांगली कोल्हापूर सारख्या पुरामध्ये सापडलेल्या लोकांसाठी आपल्या जीवाला उदार होऊन बचावकार्य तसेच त्यांना लागणारा अन्नपुरवठा मंडळामार्फत करण्यात आला आहे.


सध्या गणपती उत्सव काळामध्ये मंडळांने महिलांसाठी अनेक प्रकारचे स्पर्धा कार्यक्रम घेतलेले आहेत आणि असा आगळावेगळा कार्यक्रम पाठीमागील उद्देश असा की, महिला फक्त चुल आणि मुल यामध्ये न राहता कधीतरी घराच्या बाहेर पडून मोकळ्या मनाने खेळू तसेच बागडू शकतील.

सध्या महाराष्ट्र सरकारने जरी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले असले तरी आधीपासूनच या मंडळांने महिलांना आपल्या मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्राधान्य दिले गेले आहे. स्पर्धेत या वर्षांमध्ये महिलांसाठी बक्षीस रूपात गृहउपयोगी वस्तूंचे वाटप मोठ्या  प्रमाणात केले आहे, यामध्ये मंडळांने महिलांसाठी पिक मशीन,ठोंगा सेट, कुकर, मिक्सर मल्टीकढई,जार, पाणी बॉटल सेट, पोळी डबा, पूजा सेट, लोठा, ग्लास अशा एक ना अनेक प्रकारच्या सुमारे ४२०००/- हजार रुपयांच्या गृहपयोगी वस्तू  मंडळाने बक्षीस रूपात मांडल्या होत्या. महिलाही अतिशय चुरशीची अटीतटीची स्पर्धा करत सर्व वस्तू आपल्या घरी घेऊन गेल्या. तसेच लहान मुलांसाठीही स्पर्धा आणि बक्षीस कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 

गणेश मंडळाचा गणपती हा नवसाला पावणारा,भक्तांच्या अडचणीला धावून येणारा,अशी ख्यातीही आहे ,आणि सालाबाद प्रमाणे दरवर्षी मंडळ  गावातील सर्व लहान थोरांकरता जेवणाचेही आयोजन करत असते या दिवशी सर्वांकरिता चुलबंद आमंत्रण दिले जाते. तसेच संपूर्ण गणेशोत्सव काळ शांततेत तसेच चांगल्या प्रकारे पार पडल्याबद्दल मंडळाला भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या मंडळ स्पर्धेमध्ये लागोपाठ तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तसे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रकही मंडळाला भिगवण पोलिसांनी दिले आहे.

शेवटच्या दिवशीही गणपतीला निरोप देण्यासाठी अनेक महिला भगिनींनी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवली होती, यामध्ये महिलांनाही एक प्रकारे मिरवणुक कार्यक्रम निमित्ताने घराच्या बाहेर येऊन मोकळा श्वास,संगीत नृत्य आस्वाद घेण्यास फुरसत मिळाली. या सर्वच गोष्टींसाठी क्रांती मित्र मंडळाचे योगदान फार मोलाचे ठरते.
इंदापूर तालुक्यातील कुंभारगावच्या "क्रांती मित्र मंडळाचा" गणरायाला भावपूर्ण निरोप (VIDEO) इंदापूर तालुक्यातील कुंभारगावच्या "क्रांती मित्र मंडळाचा" गणरायाला भावपूर्ण निरोप (VIDEO) Reviewed by ANN news network on ९/२९/२०२३ ०९:२२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".