पिंपरी चिंचवडला भारत सरकारचा “गव्हर्नन्स” पुरस्कार प्रदान

 


पिंपरी : भारत सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये “गव्हर्नन्स” श्रेणीत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अॅपने देशात दुसरे स्थान पटकाविले. याबददल इंदौर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेचमुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमणस्मार्ट सारथी अॅप प्रकल्प प्रमुख अंकीत भार्गव यांनी सन्मान स्विकारला.

 इंदौर (मध्यप्रदेश) येथे बुधवारदि. 27 सप्टेंबर 2023 रोजी इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड कार्यक्रमात गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोरमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानराज्यपाल मंगुभाई पटेलगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) सचिव मनोज जोशीभारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्यासह विविध स्मार्ट सिटीचे सीईओ आदी मान्यवर उपस्थित होते. देशभरातील ८० पात्रताधारक शहरांमधून पिंपरी चिंचवडला “गव्हर्नन्स” पुरस्कार प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले. हे यश म्हणजे पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पिंपरी चिंचवड “स्मार्ट सारथी ऍप” हा एक दूरदर्शी डिजिटल उपक्रम आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी प्लॅटफॉर्मद्वारे ई-गव्हर्नन्स तसेच नागरिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. सध्या सुमारे 2 लाखाहून अधिक नागरिक अॅपवेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत. विविध उपक्रमांमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पुढाकारउपयुक्त माहितीमहापालिकेचा ऑनलाइन कर भरणाऑनलाइन विवाह नोंदजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधानागरवस्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाआयडीचा वापर करून नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण यंत्रणामनपा कार्यालये सोधण्यासाठी “जीपीएस”चा वापरआपत्कालीन वेळेत संपर्क साधण्यासाठी मदत कार्यस्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुढाकारवेबिनारचे आयोजनमनपाच्या आरोग्य अभियानांची माहितीशैक्षणिक क्षेत्रातील घडामोडीविकास प्रकल्पांची माहितीब्लॉग लेखन यासह कोविड-19 च्या प्रादुर्भावापासून नागरिकांचे संरक्षण तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या दूरदर्शी लोकोपयोगी डिजिटल उपक्रमाने देशभरात आपली छाप पाडली असून या उपक्रमात सर्वत्र कौतुक होत आहे.

देशातील 100 स्मार्ट शहरांनी गतिशीलताऊर्जास्वच्छताकचरा व्यवस्थापनसार्वजनिक जागासामाजिक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट गव्हर्नन्सचे विस्तृत प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट (ISAC) उपक्रम हाती घेतला आहे. देशभरातील 80 पात्रताधारक स्मार्ट शहरांमधूनइंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट (ISAC) 2022 ला एकूण ८४५ नामांकन मिळाले होते. पाच मूल्यमापन टप्प्यांतूनविविध पुरस्कार श्रेणींमध्ये ६६ विजेते या पुरस्कारासाठी पात्र ठरले. यामध्येप्रोजेक्ट अवॉर्ड ३५इनोव्हेशन अवॉर्ड ६राष्ट्रीय/झोनल सिटी अवॉर्ड १३राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील ५ आणि भागीदार पुरस्कार श्रेणीतील ७ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. १० थीमसह प्रोजेक्ट अवॉर्ड्स२ थीम्ससह इनोव्हेशन अॅवॉर्ड्सनॅशनल/ झोनल सिटी अॅवॉर्ड्सस्टेट अॅवॉर्ड्सयूटी अॅवॉर्ड आणि ३ थीम्ससह पार्टनर अॅवॉर्ड्सचा समावेश आहे.

 


स्मार्ट सिटीज मिशन नाविन्यपूर्ण "स्मार्ट सोल्यूशन्स"द्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधास्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल साध्य करण्याच्या ध्येयाकडे मिनशद्वारे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या सुमारे 2 लाख वापरकर्ते अॅपवेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत. पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकाच्या पुरस्कारासाठी नाव कोरल्याने शहरवासियांसाठी ही एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

       - शेखर सिंहआयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी.

पिंपरी चिंचवडला भारत सरकारचा “गव्हर्नन्स” पुरस्कार प्रदान पिंपरी चिंचवडला भारत सरकारचा “गव्हर्नन्स” पुरस्कार प्रदान Reviewed by ANN news network on ९/२७/२०२३ ०४:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".