पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुण्यातील नवले पुलाजवळ भूमकर पुलावर कंटेनर उलटला.
सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. अधिक माहिती अशी की, भूमकर पुलाची रेलिंग तोडून कंटेनर विरुद्ध दिशेने उलटला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कंटेनरचा चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
पुण्यातील नवले पुलाजवळ कंटेनर उलटला
Reviewed by ANN news network
on
७/१०/२०२३ १२:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: