अल्ट्रा झकास लवकरच करणार 'हिरा फेरी'!

 


मुंबई : मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवंनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपट कलाकृती  तयार करण्याचा चस्का अल्ट्राला लागला असून महाराष्ट्रातील ग्रामीण - शहरी प्रेक्षकांच्या पसंतीचे खुमासदार विषय आणि त्याला मनोरंजनाचा झकास गावरान तडका असं भलंमोठ्ठ पॅकेज प्रेक्षकांना फक्त याच ओटीटीवर पहायला मिळत असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. 'बोल हरी बोल' या सुपरहिट चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला घेऊन दिग्दर्शक अमोल बिडकर 'हिरा फेरी' करण्याच्या तयारीत आहेत. 

'हिरा फेरी' या चित्रपटात कॉमेडी क्वीन अर्थात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि 'बॉईज २' फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार असून त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडी स्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले असून 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.'चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

मराठी मनोरंजना वसा जपणाऱ्या 'अल्ट्रा झकास'ची 'हिरा फेरी' ही मराठी प्रेक्षकांसाठी 'श्रावण भेट' असून कुटुंबातील सगळ्यांना एकत्र बसून ओटीटीवर पाहता येईल असे निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकृतींच्या निर्मितीवर 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.' भर देत असून 'हिरा फेरी' सर्वांचे निखळ मनोरंजन करण्यात नक्की यशस्वी होईल असा विश्वास या ओटीटीचे सर्वेसर्वा सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

अल्ट्रा झकास लवकरच करणार 'हिरा फेरी'! अल्ट्रा झकास लवकरच करणार 'हिरा फेरी'! Reviewed by ANN news network on ७/१०/२०२३ ०१:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".