जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर

 



मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबीर


पिंपरी :  डॉ.  डी.  वाय.  पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रसंत तुकाराम नगरपिंपरी येथे जागतिक  प्लास्टिक सर्जरी दिनाच्या निमित्ताने दि. 10 ते 15 जुलै 2023 दरम्यान मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर येत्या सोमवारी दि 10 जुलै पासून सुरू होत असून  डॉ.  डी.  वाय. पाटील रुग्णालयाच्या हाय-टेक इमारत पहिला मजला, प्लास्टिक शल्यचिकित्सा विभाग बाह्यरुग्ण विभाग OPD क्र 10 (बी)  मध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वा  यावेळत हे  शिबिर होत आहे.    

      या शिबिरात भाजलेले रुग्णन भरणाऱ्या जखमानाक व कानाचे जन्मजात व्यंगदुभंगलेले टाळू व ओठ, लायपोसक्शनब्रेस्ट इम्प्लांट, कॉस्मेटिक सर्जरीअपघातात कापलेले स्नायू व नस, व्रण, जबड्याचे फ्रॅक्चरकारखान्यात झालेल्या हाताच्या जखमा व फ्रॅक्चरभाजलेले रुग्णांचे मानेचे व हातांची सर्जरीबेड सोरब्रेकियल प्लेक्सस इंजुरीच्या उपचारांबरोबर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. लहान मुलांमधील हात व चेहऱ्याच्या जन्मजात व्यंगावर विशेष मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा आपण विनामूल्य घेऊ शकणार आहात.

       चिकित्सेसाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांनी येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.  या मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रुग्णानी येथील सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या प्लास्टिक शल्यचिकित्सा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी डॉ. उज्वला सोनवणे 9653509999डॉ.संकल्प 7895307984  डॉ.अंकुर मोदी 9408773838  यांच्याशी संपर्क साधावा.   

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर Reviewed by ANN news network on ७/०८/२०२३ ०४:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".