पिंपरी : आय.टी. कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ६० ते ७० तरुण, तरुणींची आर्थिक फ़सवणूक करणा-या एका टोळीला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाला यश आले आहे.
महेशकुमार हरिचंद्र कोली, वय - ३२ वर्षे, रा ५५ सुखनिवास सोसायटी, लडकत पेट्रोलपंपा जवळ, सोमवार पेठ, पुणे, अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा, वय-५२ वर्षे, रा-लेन नंबर-१२ श्री राम पी. जी. जवळ, कानदवे नगर, वाघोली, पुणे, कल्पना मारुती बखाल, वय - ३० वर्षे, रा-बाबर सोळंकी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर - ४०२ ए विंग ए दत्त नगर, दिघी पुणे. श्रावण एकनाथ शिंदे, वय - ३२ वर्षे, रा- फ्लॅट नंबर - ४, लिमकर बिल्डींग, अजमेरा सोसायटी जवळ, तुकाराम नगर, वाघोली, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या सर्वांनी गरजू तरुणांना नोकरी लावण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये उकळले. बनावट नेमणूक पत्रे दिली आणि फ़सवणूक केली.
या आरोपींवर भोसरी पोलीस ठाणे येथे ५३६ / २०२३ क्रमांकाने भा.दं.वि कलम ४१९, ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने त्यांना अटक करण्यात यश मिळविले.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, दादा पवार, हवालदार प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, नाईक वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, शिपाई प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय तुंगार, सहायक निरीक्षक सागर पानमंद, हवालदार नागेश माळी, शिपाई पोपट हुलगे यांनी केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: