महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट

 


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-१

◼️नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा; तीन वर्षासाठी 1000 कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा 

▪️नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार

▪️3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार

▪️1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार

▪️डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ

▪️ 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

◼️महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान, अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा

▪️राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार

▪️ पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत

▪️तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

▪️एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार

▪️5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार


◼️महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

▪️आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून

▪️ आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता

▪️शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा

▪️3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

◼️धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची फडणवीस यांची घोषणा

◼️राज्याकडून नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा; 6000 रुपये वार्षिक निधी मिळणार

◼️संत तुकारामांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात 


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट -२


छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज सं कल्पना उद्यान: 50 कोटी

- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये


अमृत काळातील महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प 

छत्रपती शिवाजी महाराज- शिवराजा संकल्पना. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करणार. त्यासाठी उद्यानांमध्ये व्यवस्था. यासाठी २५० कोटींचा निधी. 

शिवनेरी जीवनचरित्रावर अधारीत संग्रहालय. ३५० कोटींची तरतूद.

भारत विकसित राष्ट्र व्हावे ही संकल्पना. १ ट्रीलीयन डॉलर्सचा महाराष्ट्राचा वाटा. आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापाना. मित्र ही संस्था स्थापन.


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना


- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी

 -  प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ

- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार


 महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

 

- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार

- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत

- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार

- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.


 गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

 

- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून

- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार

- अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ.


नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार

- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार

- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार

- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ

- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी.


काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

 

- 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड

- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव

- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र

- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना

- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद


श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार

 

- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’

- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार


धनगर समाजाला 1000 कोटी रुपये

महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार

विकास महामंडळाची स्थापना करणार,

10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार

 - धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये

- 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी

- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार

- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार

- अहमदनगर येथे मुख्यालय असणार

- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-३


◼️️ इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना

 प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये

(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी

(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)


◼️ हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

 

- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये

- 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प

- 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी

- 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया

- 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने

- ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे


◼️ संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य


- अंत्योदयाचा विचार

- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार

- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान


◼️ जलयुक्त शिवार 2.0 योजनेची घोषणा, 5000 गावांमध्ये योजना सुरू होणार

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0, अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

- जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये

- गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष


◼️ शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा

शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा

- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना

- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा

- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ

- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप

- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी

- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत


◼️ आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

 

- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

◼️ महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, सरकारची मोठी घोषणा

◼️ एसटी प्रवासात महिलांना तिकिट दरात सरसकट 50 टक्क्यांची सवलतीची घोषणा


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-३


◼️️ इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना

 प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये

(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी

(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)


◼️ हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

 

- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये

- 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प

- 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी

- 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया

- 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने

- ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे


◼️ संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य


- अंत्योदयाचा विचार

- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार

- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान


◼️ जलयुक्त शिवार 2.0 योजनेची घोषणा, 5000 गावांमध्ये योजना सुरू होणार

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0, अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

- जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये

- गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष


◼️ शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा

शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा

- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना

- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा

- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ

- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप

- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी

- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत


◼️ आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

 

- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

◼️ महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, सरकारची मोठी घोषणा

◼️ एसटी प्रवासात महिलांना तिकिट दरात सरसकट 50 टक्क्यांची सवलतीची घोषणा


महाराष्ट्र  अर्थसंकल्प अपडेट-४


◼️ राज्यातील विमानतळांच्या विकासांसाठी निधीची तरतूद, पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार


- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी

- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार

- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी

- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे


◼️ आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी

- आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना

- बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना

- धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना

- या तिन्ही योजनांसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांची तरतूद


◼️ नवीन महामंडळांची स्थापनेच्या घोषणेसह भरीव निधी सुद्धा देणार

- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ

- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ

- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत

- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार


◼️ असंघटित कामगार, दिव्यांगांसाठी मोठी घोषणा; महामंडळ स्थापनेसोबत सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना

- 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार

- ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

- माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी

- स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार


◼️ ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

- ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार

- ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार

- वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-५


◼️ शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

 

- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये


◼️ विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, गणवेशही मोफत; 1000 रुपयांची शिष्यवृत्ती 5000 रुपये करण्याची घोषणा


- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार

- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार


◼️ मुंबई महामुंबईसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद


- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये

- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण

- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये

- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-६


◼️ महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद


- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये

- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये

- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये

- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी

- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी

- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये


◼️ श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना; कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा होणार सन्मान


- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी

- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना


◼️  महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद

- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये

- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये

- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये

- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये

- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये

- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये

- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये

- कामगार विभाग : 156 कोटी रुपये


◼️ प्रथम अमृत- शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी 29,163 कोटी रुपयांची तरतूद


- कृषी विभाग : 3339 कोटी रुपये

- मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये

- सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये

- फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये

- अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये

- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये

- जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये

- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये

- मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये


◼️ *राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा *

 

- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे

- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

- मुंबई विद्यापीठ

- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन

- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान

- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-७


◼️ भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास; 53,058 कोटी रुपयांची तरतूद


विभागांसाठी तरतूद

- सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये

- ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये

- नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये

- नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये

- परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये

- सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये


◼️ श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा

- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे

- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

- सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये

- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये

- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये

- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना

- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये

- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा


महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट-८


मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी

50 कोटींचा मत्स्यविकास कोष

विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा


- प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

- प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष

- मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली

- त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ

- वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार

- यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद

- पारंपारिक मासेमारी करणार्‍या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा

महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट Reviewed by ANN news network on ३/०९/२०२३ ०४:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".