देवघर वाक्षेपवाडी प्रीमिअर लीग २०२३
मंदार आपटे
खेड : तालुक्यातील देवघर वाक्षेपवाडी येथे भरविण्यात आलेल्या तिसऱ्या वर्षीच्या प्रीमिअर लीगवर सलग दुसऱ्यांदा सह्याद्री टायगर्स संघाने विजेतेपदावर मोहोर उमटविली आहे.विजेत्या सह्याद्री टायगर्स संघाचे मालक चेतन साळवी आणि निवृत्ती पवार यांच्यासह वाक्षेपवाडी तर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
नुकत्याच भरविण्यात आलेल्या या वाक्षेपवाडी प्रीमिअर लीगमध्ये सह्याद्री टायगर्स, मर्द मराठा, काळकाई कृपा, काळकाई योद्धा, जय हनुमान, स्वराज्य रक्षक,मावळा सह्याद्रीचा आणि शिवबा वॉरियर्स या आठ संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या सह्याद्री टायगर्स संघाचे कर्णधार जितेंद्र इंगळे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केल्याने त्यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले. सलामीवीर विकास इंगळे यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकाविला तर सुजित जाधव,राजेश शिंदे आणि सागर शिंदे यांनी अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन दाखविले. स्पर्धेत फलंदाज गणेश इंगळे,राजेश इंगळे यांनी चांगली कामगिरी केली.क्षेत्ररक्षक चेतन साळवी , यष्टीरक्षक शुभम कदम या सर्वांच्या सांघिक कामगिरीमुळे सह्याद्री टायगर्स संघाने विजेतेपदावर मोहोर उमटविली. वाक्षेपवाडी प्रीमिअर लीग व विजेत्या सह्याद्री टायगर्स या संघाने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन करून प्रीमिअर लीग यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०९/२०२३ ०९:५५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: