साखरपा: एसटी बसच्या धडकेने उर्मिला अनंत कबनुरकर (७५) यांचा मृत्यू झाला.
साखरपा येथील प्रसिद्ध व्यापारी श्रीधर कबनूरकर यांच्या त्या मातु:श्री होत्या. साखरपा बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूने चालत जाणार्या उर्मिला अनंत कबनूरकर यांना एसटी बसने जोरदार धडक दिली. त्यांच्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात नेण्यात येत होते. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
कोकण : एसटी बसच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२३ ०९:४८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: