रत्नागिरी : होळीसाठी रेल्वेने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत. पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023 दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.
01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा - चिपळूण अनारक्षित मेमू 01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण - रोहा अनारक्षित मेमू दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणाऱ्या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२३ १०:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: