खेड: तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य येथे 'जागतिक महिला दिन' मोठ्या साजरा करण्यात आला.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून मुंबई विद्यापीठ महिला विकास विभाग व ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला संरक्षण' या विषयावर जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
खेड येथील अॅड शितल ओकटे, लोटे येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक संतोषी पडळकर तसेच खेड येथील संरक्षण प्रशिक्षक वनश्री कांबळे या उपस्थित होत्या. अॅड शितल ओकटे यांनी महिलाविषयक कायदे, अधिकार
यावर मार्गदर्शन केले. तसेच संतोषी पडळकर यांनी महिला सबलीकरण, सायबर क्राईम यावर महत्वपूर्ण
मार्गदर्शन केले तर वनश्री कांबळे यांनी स्वसंरक्षणासाठी विद्यार्थिनींना प्रशिक्षणपर मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी लागणारे धडे या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आले.
यामध्ये प्रत्येक महिला हि स्वावलंबी असली पाहिजे तसेच तिला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे यासाठी
मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ज्ञानदीप महाविद्यलयाच्या महिला विकास विभाग प्रमुख प्रा. ऐश्वर्या कापडी तसेच प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यशाळेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थिनी तसेच शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून प्रा. हेमलता इंगवले, नियोजनासाठी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सुनील पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२३ ०९:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: