पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी; संकेत चोंधे यांचा पुढाकार


परिसरातील शालेय विद्यार्थी-पालकांमधून उपक्रमाचे कौतूक

पिंपरी  :  पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातील शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्या विनय निकेतन शाळेतील ७५० विद्यार्थ्यांची, तर पिंपळे निलख गावातील महापालिका शाळा  क्र. ५२ शाळेतील ३५० विद्यार्थ्यांची तसेच शाळेतील शिक्षकांची तज्ञांद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा  शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे आणि विजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले होते.
शाळकरी लहान मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही पिढी सुदृढ व सक्षम व्हावी या उद्देशाने नगरसेवक संदिप आण्णा कस्पटे युवा मंच व व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमानातुन कस्पटे वस्ती मनपा शाळेतील मुलांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर आयोजित केले होते. या अंतर्गत शाळेतील सर्व मुलांचे डोळे तपासण्यात आले व आवश्यक त्यांना मोफत चष्मे वाटण्यात आले. या शिबिरासाठी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चौंधे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यासोबतच, रखुमाई महिला सेवा संस्था व विजय स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी शाळा क्र. ५५ येथे संदिप भानुदास नखाते, आरती संदिप नखाते यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात सुमारे ७०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.


महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व्हावी. त्यासाठी शाळा प्रशासन किंवा पालकांना कोणताही खर्च होवू नये. याकरिता आम्ही काही कंपनींच्या सहयोगातून मोफत हा उपक्रम घेतला आहे. त्याला परिसरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शहरातील सर्वच महापालिका शाळांमध्ये असा उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे.
- संकेत चोंधे, शहराध्यक्ष, भाजपा, युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.
पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी; संकेत चोंधे यांचा पुढाकार पिंपरी  :  महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी; संकेत चोंधे यांचा पुढाकार Reviewed by ANN news network on १२/१४/२०२२ १०:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".