फंडाची वैशिष्ट्ये: -
· पोर्टफोलिओचा मॅकॉली कालावधी 7 वर्षांपेक्षा जास्त मिळेल अशाप्रकारच्या साधनांमध्ये गुंतवणूक करणारी ओपन एंडेड डेट स्कीम. तुलनेने उच्च व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम
· बेंचमार्क – निफ्टी दीर्घकालीन डेट A – III
· एनएफओ प्रारंभ तारीख: 7 डिसेंबर 2022
· एनएफओ समाप्ती तारीख – 21 डिसेंबर 2022
· किमान गुंतवणूक – रू. 5,000 आणि त्यानंतर रू. 1/- च्या पटीत
· फंड व्यवस्थापक: श्री. देवांग शहा, श्री. कौस्तुभ सुळे आणि श्री. हार्दिक शहा
· निर्गमन भार – नाही
मुंबई : अॅक्सिस म्युच्युअल फंड या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या फंड हाउसेसपैकी एका कंपनीने त्यांचा नवा फंड - अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंड लाँच केला आहे. ही एक पोर्टफोलिओचा मॅकॉली कालावधी ७ वर्षांपेक्षा जास्त मिळेल अशाप्रकारच्या साधनांमध्ये गुंतवणूक करणारी ओपन एंडेड डेट स्कीम असून तुलनेने उच्च व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम देणारी आहे. नवा फंड निफ्टी लाँग ड्युरेशन डेट इंडेक्स A – III चा मागोवा घेईल. अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंड ७ डिसेंबर २०२२ रोजी सुरू होणार असून २१ डिसेंबर २०२२ रोजी बंद होणार आहे. फंडाचे व्यवस्थापन देवांग शहा, श्री. कौस्तुभ सुळे आणि श्री. हार्दिक शहा करत असून त्यासाठीची किमान गुंतवणूक रक्कम – रू. 5,000 आणि त्यानंतर रू. 1/- च्या पटीत असेल.
मध्यम प्रकारची जोखीम घेत सातत्यपूर्ण परतावे देणे हे अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंडचे उद्दिष्ट आहे. या उत्पन्नाला पोर्टफोलिओच्या भांडवल वृद्धीची साथ मिळेल. सध्या फंडाद्वारे दीर्घकालीन सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट असून अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंडचा निवृत्तीच्या वेळेस दीर्घकालीन उत्पन्न सुविधा तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याशिवाय दीर्घकालीन बाँड उत्पन्न व्यापक प्रमाणात स्थिर आणि गेल्या २० वर्षांत महागाई दराच्या वर राहिलेले आहेत. (स्त्रोत – ब्लूमबर्ग, सीएसओ, अॅक्सिस एमएफ रिसर्च. ३० नोव्हेंबर २०२२ च्या डेटानुसार महगाई दरापेक्षा जास्त मार्केट लिंक्ड रिटर्न्स)
अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंडचे सध्याचे पोझिशनिंग
· दीर्घकालीन रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे – या फंडाद्वारे गुंतवणुकदारांना व्याज दर चक्र ऐन भरात असताना त्यात गुंतवणूक करण्याची व पर्यायाने दीर्घकालीन दर मिळवण्याची संधी घेता येईल.
· उच्च दर्जाचा पोर्टफोलिओ – दीर्घकालीन सरकारी रोख्यांमध्ये (३०+ पेक्षा जास्त वर्ष) गुंतवणूक करण्याचा या फंडाचा प्रयत्न असेल व त्याद्वारे गुंतवणुकदारांना एसओव्ही रेटेड साधनांमध्ये गुंतवणूक पुरवली जाईल.
· संभाव्य कमी अस्थिरता – इक्विटी मार्केटच्या तुलनेत डेट मार्केटमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत सामान्यपणे दीर्घ काळात कमी अस्थिरता असते.
· लिक्विडीटी – गुंतवणुकदारांना निर्देशांकसूचीचे लाभ आणि पैसे काढताना प्रवेश किंवा निर्गमन भार नसल्यामुळे मर्यादित कररचना लागू होईल आणि आणीबाणीच्या वेळेस सहजपणे पैसे काढता येतील.
फंडच्या लाँचवेळेस अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले, ‘सध्याच्या मॅक्रो वातावरणात निश्चित उत्पन्नाचे मार्ग गुंतवणुकदारांसाठी विशेषतः मध्यमवयीन गुंतवणुकदारांसाठी निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी आकर्षक पर्याय ठरत आहेत. अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंड लाँच करत आम्ही गुंतवणुकदारांना निवृत्तीसाठीच्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करण्यास प्रोत्साहन देत आहोत. निवृत्तीसाठीच्या पारंपरिक उत्पादनांच्या तुलनेत डेट म्युच्युअल फंडामध्ये लक्षणीय कर रचना आणि मार्केट लिंक्ड परतावे देण्याची जास्त क्षमता आहे. अर्थपूर्ण दीर्घकाळात उत्पन्न क्षमतेतील दरीमुळे अंतिम रकमेवर परिणाम होऊ शकतो. एसआयपी आणि एसडब्ल्यूपीसारख्या पद्धतशीर गुंतवणूक सुविधांच्या मदतीने गुंतवणुकदारांना दीर्घकालीन सरकारी रोखे वापरत पूर्णपणे लवचिक गुंतवणूक योजना तयार करता येऊ शकतो.’
सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) म्हणजे काय?
एसडब्ल्यूपी हे नाव युनिटधारकांना योजनेत त्यांनी केलेली गुंतवणूक दर काही काळाने (मासिक/तिमाही/सहामाही/वार्षिक) विशिष्ट रक्कम काढण्यासाठी देण्यात आलेला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅन असे सुचवणारे आहे. गुंतवणुदारांना त्यांच्या गुंतवलेल्या रकमेतून नियमितपणे रोखीचा प्रवाह तयार करता येईल आणि उर्वरित रक्कम फंडात गुंतवलेली राहील, म्हणजे त्यांना मार्केट लिंक्ड परतावे मिळत राहातील.
*नोट – वर नमूद केलेले घटक परिपूर्ण नाहीत. गुंतवणुकदारांनी आपल्या कर सल्लागारांशी त्यांचा पोर्टफोलिओ व उत्पादनाच्या अनुकूलतेविषयी चर्चा करावी.
स्त्रोत: ब्लूमबर्ग, अॅक्सिस एमएफ रिसर्च
उत्पादन लेबलिंग:
हे उत्पादन आपल्यासाठी अनुकूल आहे की नाही याविषयी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास गुंतवणुकदारांनी आपल्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करावी (उत्पादन लेबलिंग न्यू फंड ऑफरदरम्यान तयार केले जाते व ते योजनेची वैशिष्ट्ये किंवा मॉडेल पोर्टफोलिओवर आधारित असते. त्याचबरोबर प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यानंतर एनएफओनंतर त्यात बदल होऊ शकतो.)
अॅक्सिस लाँग ड्युरेशन फंड भांडवल संरक्षण किंवा परताव्याची खात्री देणारी योजना नाही. गुंतवणुकीचे धोरण तपशीलवार जाणून घेण्यासाठी आणि योजनेच्या इतर वैशिष्ट्यांसाठी कृपया एसआयडीचा संदर्भ घ्यावा.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा
व्हाट्सअप
: https://api.whatsapp.com/send?phone=918483079579
जाहिरात

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: