विधानसभा प्रश्नोत्तरे : 'कोरोना'च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठीकृती दल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : चीनसह अन्य काही देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून
सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी
सांगितले की, कोरोना
विषाणूच्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. कृती दल गठित करून आणि केंद्र
सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल.
विधानसभा प्रश्नोत्तरे : 'कोरोना'च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठीकृती दल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Reviewed by ANN news network
on
१२/२२/२०२२ १२:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: