‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' लॅंडस्केप, स्केचिंग ' कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. ' चित्रकार दिलीपकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. रविवार,दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता मुक्तांगण वेधशाळा ,(सेनापती बापट रस्ता) येथे ही कार्यशाळा झाली.
ही कार्यशाळा विनामूल्य होती.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १४८ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. मुकुंद लेले आणि मान्यवर उपस्थित होते.
सुलोचना नातू विद्यामंदिर, परांजपे विद्यामंदिर मधील ४० विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा
जाहिरात
पुणे : लॅंडस्केप, स्केचिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२२ ०८:४४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: