पुण्याच्या रस्त्यांवर तुळशी रोपांचे वाटप, तुलसी पुजनाचे संदेश
पुणे : तुलसी पूजन दिवसाच्या प्रसारासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून रविवार, दि १८ डिसेंबर रोजी पुण्यात 'भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा' काढण्यात आली. २५ डिसेंबर हा 'तुलसी पूजन दिवस' म्हणून आसाराम बापूंच्या अनुयायांकडून २०१४ पासून साजरा केला जातो.याही वर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यात आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात आली. सफेद वस्त्रे आणि भगवी टोपी, उपरणी परिधान करून भक्तगण सहभागी झाले. तुलसीपूजनाचे, तुलसी महात्म्य सांगणारे फलक त्यांनी हाती घेतले होते. आसाराम बापूंच्या छायाचित्रांचे रथही सामील झाले होते.'यतो धर्म,स्ततः जय ', ' अपनी संस्कृती, अपनी विरासत ', ' आदते बदलो, विचार बदलो' असे संदेश देणारे फलक अनुयायांनी हाती घेतले होते.
यात्रेदरम्यान तुळशीच्या रोपांचे आणि तुलसी पूजन दिवसाचे संदेश असलेली पत्रके वाटण्यात आली.संभाजीबागेत यात्रा समाप्तीनंतर आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
२५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात.त्याला पर्याय म्हणून मानवकल्याणासाठी,स्वास्थासाठी,पर्यावरण रक्षणासाठी तुलसी पूजन उपक्रम आयोजित केला जातो.
या कालावधीत तुलसी पूजन,जप माळ पठण,गोपूजन,हवन,गौ-गीता-गंगा जागृती,सत्संग आदी उपक्रम आयोजित केले जावेत,असा अनुयायांचा प्रयत्न आहे,अशी माहिती देण्यात आली.
प्रकाश कनोज, दीपक भाई, गणेश सुर्वे, सत्येंद्र भाई, नीलेश परदेशी, सुमीत भाई, सौ. नागोशे, ललीता ताई, जितेंद्र नंदनवार यांच्यासह २ हजार अनुयायी सहभागी झाले.
जाहिरात
पुणे : आसाराम बापूंच्या अनुयायांकडून पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२२ ०८:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: