विधिमंडळाच्या कामकाजाला ‘वंदेमातरम्’ने
सुरूवात
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदेमातरम्’ ने सुरूवात झाली. यावेळी विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभेतील मान्यवर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा विधानसभेत
परिचय
नागपूर :मुंबई उपनगर जिल्ह्यातील
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यऋतुजा लटके
यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला करून दिला.
नुकत्याच
झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व भागातून
त्या निवडून आल्या आहेत.
विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांचीघोषणा
नागपूर :विधिमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षांची
तालिका नामनिर्देशित केली.
सदस्य
सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावत, सुभाष धोटे, सुनिल भुसारा यांचा यात समावेश आहे.
विधानपरिषद तालिका सभापतींच्या
नावांचीघोषणा
नागपूर, दि.19 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अभिजीत वंजारीयांच्या नावांची घोषणा केली.
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना
श्रद्धांजली
नागपूर :
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधानपरिषद माजी सदस्य सुरेश विठ्ठलराव पाटील, प्रभाकर अनंत संत, शांताराम पुंजाजी
आहेर यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला व हा
शोकप्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. दिवंगत सदस्यांबद्दल सभागृहाच्यावतीनेभावना
व्यक्त केल्यायावेळी सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: