सत्तेवर असताना विदर्भासाठी काही केले नाही, उद्धवजी आता नागपुरात येऊन काय करणार ? : चंद्रशेखर बावनकुळे

 



 

नागपूर : उद्धवजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे विदर्भासाठी काही केले नाहीनागपुरात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले नाहीतुमचा काळ संपलाआता नागपूरला येऊन काय करणारअसा खणखणीत सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

 

भाजपा प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्याध्यक्षांच्या एक दिवसाच्या बैठकीचे सोमवारी नागपूर येथे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत  प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते.

 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कीमहाविकास आघाडीला विदर्भात तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशन आयोजित केले नाहीविदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केले नाहीसत्तेवर असताना त्यांनी विदर्भाच्या विकासाबाबत बेईमानी केली. महाविकास आघाडीला विदर्भ आणि मराठवाडा माफ करणार नाही. उद्धवजी सत्तेवर असताना अडीच वर्षे विदर्भात का आला नाहीत आता तुमचा काळ गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काळ आला.

 

त्यांनी सांगितले कीविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याचे घोर विरोधी आहात. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही म्हणून भावनिक मुद्दे मांडून संभ्रम निर्माण करत आहे.

 

ते म्हणाले कीराज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले आणि परिवर्तन झाले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आजच्या दिवसभराच्या बैठकीत या विषयावर आणि संघटनात्मक बळकटीवर चर्चा करण्यात येत आहे. २०२४ साली निवडणुकीला सामोरे जाताना जनसामान्यांशी संपर्क साधून पक्ष संघटना बळकट करत आहोत. उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील यासाठीची योजना अंमलात आणत आहोत.



बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा 
व्हाट्सअप : https://api.whatsapp.com/send?phone=918483079579 
  

  जाहिरात


सत्तेवर असताना विदर्भासाठी काही केले नाही, उद्धवजी आता नागपुरात येऊन काय करणार ? : चंद्रशेखर बावनकुळे सत्तेवर असताना विदर्भासाठी काही केले नाही, उद्धवजी आता नागपुरात येऊन काय करणार ? : चंद्रशेखर बावनकुळे Reviewed by ANN news network on १२/१९/२०२२ ०६:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".