पुणे : सनातन संस्था, पुणे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते त्या अंतर्गत गरजुंना अन्नदान, कपडे वाटप, शालेय साहित्य वाटप असे निरनिराळे उपक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून १५ डिसेंबर या दिवशी येथील बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड, पुणे या शाळेतील ग्रंथालय, मुले, शिक्षक आणि पालकांसाठी सनातन निर्मित २०३ ग्रंथांचा संच भेट देण्यात आला. शाळेमध्ये मुलांसाठी 'नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे' या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्रीमती वर्षा भिडे आणि सौ. नूतन दक्षिणदास यांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना हे ग्रंथ देण्यात आले. सौ.नूतन दक्षिणदास यांनी मुलांना नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे आणि चांगल्या सवयी कशा जोपासाव्यात, गुरुजनांचा आदर कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेसाठी अतिशय उपयुक्त अशी ही पुस्तके आहेत. सुजाण नागरिक घडण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असे हे साहित्य आहे, आपल्या हिंदू संस्कृतींची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे त्या दृष्टीने या पुस्तकांची महती मोठी आहे असा अभिप्राय शाळेतील एका शिक्षकांनी दिला.
तसेच राजगुरुनगर येथील हटकेश्वर वस्तीगृह येथेही १५ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने अन्नदान, ग्रंथसंच भेट आदी उपक्रमांचे आयोजन
Reviewed by ANN news network
on
१२/१६/२०२२ ०७:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: