निगडी येथील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद


पिंपरी : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोशल हँड्स फाउंडेशन आणि ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गरजू  युवक -युवती यांच्यासाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर रविवार( दि.११/१२/२०२२) रोजी प्राधिकरण, निगडी येथे संपन्न झाले. समाजातील ६०/६५ युवक -युवती यांनी या संधीचा लाभ घेतला.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून  प्रा.भूषण ओझर्डे ( शिक्षण तज्ञ, संचालक, ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन ) यांनी मार्गदर्शन शिबिरात पोलिस भरतीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची छाननी कशी होते याची माहिती दिली. लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा, किती गुणांचे प्रश्न असतात. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व कमी वेळेत पेपर कसा सोडवला पाहिजे, या विषयाचे मार्गदर्शन केले.

तसेच शारीरिक चाचणी संदर्भात प्रा. कुमठाळे (संचालक, एनएसपीटी) यांनी मार्गदर्शन शिबिरात शारीरिक चाचणीमध्ये किती प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी गुण कसे दिले जातात. तसेच शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणकोणते शारीरिक व्यायाम केले पाहिजे, आहार काय असला पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन केले.

यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पिंपरी चिंचवड मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कामराज व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी सहभागी युवकांना प्रेरणादायी संदेश दिले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी सोशल हॅन्ड फाउंडेशनचे अध्यक्ष  मदन दळे, सचिव- सचिन आढागळे, डॉ. शीतल महाजन, चांगदेव कडलक व इतर सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयश्री ओझर्डे यांनी केले. तर आभार दिपाली ओझर्डे यांनी व्यक्त केले.

 

निगडी येथील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद निगडी येथील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास  प्रतिसाद Reviewed by ANN news network on १२/१४/२०२२ १०:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".