पुणे : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'श्री महालक्ष्मी महात्म्य' ही पुस्तिका आता सात भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, बंगाली, इंग्रजी अशा ७ भाषा मंध्ये ही पोथी प्रकाशित करण्यात आली आहे.'जय हिंद' प्रकाशनच्या वतीने संचालक हेमंत रायकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. महालक्ष्मी महात्म्य हे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी घरोघरी वाचले जाते आणि आवर्जून एकमेकांना दिले जाते. अनेक दशकांपासून चालत आलेली ही परंपरा आता सात भाषांमध्ये पोहोचली आहे. घरात समृद्धी यावी यासाठी महिलावर्ग आवर्जून या पोथीचे पठण करतो ,तसेच व्रत देखील केले जाते.४८ वर्षांपासून जयहिंद प्रकाशन तर्फे ही पुस्तिका प्रकाशित केली जात आहे.'जय हिंद' प्रकाशनने श्री महालक्ष्मी महात्म्य हे अॅप देखील भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे,असे रायकर यांनी सांगितले.
पुणे : 'श्री महालक्ष्मी महात्म्य' पुस्तिका सात भाषांमध्ये !
Reviewed by ANN news network
on
१२/१४/२०२२ १०:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: