पुणे : एमक्युअर फार्मास्युटिकल्सने अलीकडेच सामाजिक बांधिलकी उपक्रम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यातील खडकी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक मौखिक आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती.
आलेगावकर प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा आणि एसव्हीएस प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मौखिक आणि वैयक्तिक स्वच्छता पद्धतींबद्दल शिक्षित करण्यासाठी ही शिबिरे घेण्यात आली. भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, कात्रज, पुणे आणि एमक्युअरच्या व्यावसायिक आरोग्य केंद्राच्या (OHC) डॉक्टरांसह शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना दातामध्ये खड्डा पडण्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि दातांची स्वच्छता राखण्यासाठी दात घासण्याचे योग्य तंत्र आणि किती वेळेला दात घासावेत याबाबत योग्य प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना नखे कापणे, कानातला मळ काढणे, त्वचेची अॅलर्जी आणि पुरळ तपासणी यासारख्या वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयींची गरज असल्याची जाणीव करून देण्यात आली आणि रंगांधळेपणासाठीची दृष्टी तपासणीही करण्यात आली.
एमक्युअर गेल्या नऊ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, डॉक्टरांच्या भेटी आणि वैद्यकीय उपचारांचे आयोजन करत आहे. कोविड-१९ मुळे घ्याव्या लागलेल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर कंपनीने वार्षिक दंत आणि सर्वसाधारण आरोग्य शिबिर पूर्ण क्षमतेने आयोजित केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: