पुणे : लेनदेनक्लब अल्फाने पुण्यात 500 हून अधिक स्टार्ट-अप्ससह ‘भारत फिनटेक प्रोग्राम’ चे केले अनावरण
उदयोन्मुख ग्रामीण फिनटेक स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश
• टियर २ आणि ३ शहरांमधील नवोदित उद्योजकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळेल
• महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सना मार्गदर्शन आणि समर्थन देणारे अभियान
पुणे : निम-शहरी आणि ग्रामीण फिनटेक स्टार्ट-अप्सना गती देण्यासाठी, लेनदेनक्लब अल्फाने ने पुण्यात 'भारत फिनटेक प्रोग्राम'चा उपक्रम सुरू केला आहे. लेनदेनक्लब चे कॉर्पोरेट व्हेंचर कॅपिटल (सिव्हीसी) असलेल्या लेनदेनक्लब अल्फाने गेल्या महिन्यात मुंबईत हा उल्लेखनीय कार्यक्रम सुरू केला. सध्या हा कार्यक्रम गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि राजस्थानमध्ये सुरू आहे. देशभरात आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेसह, आता 500 हून अधिक सहभागी स्टार्ट-अप्स इनक्युबेशन कार्यक्रमाचा एक भाग होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शहरी आणि ग्रामीण स्टार्ट-अप इच्छुकांमधील ज्ञानाची तफावत भरून काढताना इच्छुक स्टार्ट-अप संस्थापकांना ज्ञान देण्यासाठी विविध वेबिनार आयोजित करण्यात आले होते. लेनदेनक्लब अल्फा आणि स्टार्ट-अप रेसियू द्वारे नुकत्याच झालेल्या पुणे कार्यक्रमात फिनटेक परिसंस्थेमधील प्रमुख नेते जसे की प्रख्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सल्लागार सुदिन बारावकर, आयडियाज टू इम्पॅक्ट्सचे संस्थापक संचालक गिरींद्र कसमाळकर, एफआयएसचे ग्राहक सेवा संचालक प्रशांत माने आणि फिनटेक उद्योगातील अनुभवी तज्ञ सचिन कोटी उपस्थित होते.
हा कार्यक्रम भारताच्या दुर्गम भागातील फिनटेक क्षेत्रामधील नवनवीन महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप्सचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. या स्टार्ट-अप्सच्या वाढीला गती देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक गुंतवणुकीसह समर्थन यावर या कार्यक्रमाद्वारे लक्ष केंद्रित केले जाईल. त्याकरता गुंतवणुकीसाठी कॉर्पस फंडही स्थापन करण्यात आला आहे. सहभागी झालेल्या स्टार्ट-अप्सपैकी, ३०% पेक्षा जास्त स्टार्ट-अप्स त्यांच्या संकल्पनेच्या टप्प्यात होते, तर १५% पेक्षा कमी त्यांच्या विचाराधीन टप्प्यात होते.
लेनदेनक्लब अल्फाचे प्राचार्य रजत सिन्हा म्हणाले, "गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात स्टार्ट-अप्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात २०२१ मध्ये अंदाजे ५० अब्ज डॉलर मूल्य असणारे ६,००० हून अधिक फिनटेक स्टार्टअप्स २०२५ पर्यंत १५० अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पुणे हे कल्पक उपक्रमांच्या आघाडीच्या १०० जागतिक क्लस्टर्सपैकी एक आहे. संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र असलेल्या या शहरातील सर्वात नाविन्यपूर्ण व्यवसाय ओळखण्याच्या मोहिमेवर आम्ही आहोत.
अनुकरणीय नेतृत्व, भांडवल आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी काम आणि पाठबळ यासाठी आवश्यक असलेले दिशादर्शन याद्वारे महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप्सना मदत करण्याची आमची योजना आहे. कॅटॅलिस्ट म्हणून काम करून स्टार्ट-अप्सना आवश्यक मदत पुरविणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे त्यांना प्रगती करायला आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या फायद्यासाठी उत्पादने किंवा सेवांमध्ये नाविन्यपूर्णता आणण्यास मदत होणार आहे. पुढे जाऊन आम्हाला आशा आहे की आमचा गुंतवणूक निधी फिनटेक स्टार्ट-अप परिसंस्थेला चालना देऊन राष्ट्र उभारणीत योगदान देईल."
हा कार्यक्रम बिगर-महानगरी प्रदेशांमध्ये नाविन्यपूर्णता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देत आहे. नवोदित कंपन्यांना नवीन उत्पादने तयार करण्यासाठी आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी, सहाय्य आणि दिशा देण्यासाठी मदत करेल. देशभरातून फिनटेकमध्ये स्टार्टअप तयार करणारे कोणीही कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.
लेनदेनक्लब अल्फा ह्या कार्यक्रमाची पोहोच वाढवण्यासाठी इतर राज्यांमध्येही स्टार्ट-अप सहभाग ड्राइव्ह चालवेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: