'रेडझोन'ची 2 हजार यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा : खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

 


पिंपरी :  देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) वाढवलेली 2,000 यार्डांपर्यंतची हद्द कमी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या सदस्यांनी स्थानिक लोकांचा कोणताही विचार न करता वेग-वेगळी मते दिली आहेत. त्यानुसार 2,000 यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. 2,000 यार्डांपर्यंत  हद्द केल्यास निम्मे पिंपरी-चिंचवड शहर 'रेडझोनबाधित होईल. त्यामुळे 2,000 यार्ड 'रेडझोन'ची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करावा. स्थानिक लोकप्रतिनिधीराज्य सरकार यांची एकत्रित बैठक घ्यावी. चर्चा करुनच पुढील कारवाई करावी अशी जोरदार मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

 

खासदार बारणे म्हणालेमावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड दारूगोळा कारखान्यात संरक्षण विभागासाठी 1982 पासून पायरो टेक्नोलॉजीजैसे 16 एमएम155 एमएम की स्मोग आणि सैनिकांसाठीची महत्वाची यंत्रसामग्रीसिग्नलिंग यंत्रे निर्माण केली जातात. या कारखान्यात अति स्फोटके निर्माण केली जात नाहीत. या भागाला जोडून संरक्षण विभागाच्याच इमारतींसह तेथील अधिकाऱ्यांची निवासस्थानेकार्यालयशाळारुग्णालयेदेहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयपिंपरी-चिंचवड महापालिकातळवडे आयटी पार्कपीएमआरडीएचे क्षेत्र आहे. या भागात सुमारे 5 ते 6 लाख लोकांचे वास्तव्य असून  महापालिकापीएमआरडीएदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनेक गृहप्रकल्पांना मान्यता दिली आहे. अनेक वर्षांपासून या भागात मोठ-मोठ्या इमारती असून लोकांचे वास्तव्य आहे. या भागात रस्तेपाणीवीज या सुविधा दिल्या आहेत. संपूर्ण भाग संरक्षण विभागाचाही नाही.

 

सुरुवातीला संरक्षण विभागाच्या सीमाभिंतीपासून 'रेडझोन'ची हद्द 600 यार्डांपर्यंतच होती. परंतु2013 मध्ये ती अचानक 2,000 यार्डांपर्यंत वाढविण्यात आली. वाढवलेली हद्द कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करत आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. 2000 हजार वरुन 500 यार्ड हद्द करण्याबाबत तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरनिर्मला सीतारमणआताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. त्यानंतर संरक्षण विभागाने एक समिती गठीत केली होती. समितीच्या सदस्यांनी स्थानिक लोकांचा कोणताही विचार न करता वेग-वेगळी मते दिली आहेत.

 

त्यानुसार 2,000 हजार यार्ड हद्द करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने हस्तक्षेप करावा.  2,000 हजार यार्डांपर्यंत हद्द निश्चित केल्यास अर्धे पिंपरी-चिंचवड शहरअनेक रहिवाशी इमारती 'रेडझोनहद्दीत येतील. त्यामुळे भविष्यात या भागात कोणताही विकास होणार नाही. मागील अनेक वर्षांपासून हद्द कमी करण्याची मागणी करणाऱ्या लोकांवर मोठा अन्याय होईल. त्यामुळे 2,000 हजार यार्डांपर्यंची कायम करण्यात येणारा हद्दवाढीचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करावाअशी आग्रही मागणी खासदार बारणे यांनी संसदेत केली.

'रेडझोन'ची 2 हजार यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा : खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी 'रेडझोन'ची  2 हजार यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा : खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत  मागणी Reviewed by ANN news network on १२/१४/२०२२ १०:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".