पिंपरी : निवडणुका जवळ आल्यामुळे स्वत:चे आणि नातेवाईकांचे कोटकल्याण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधा-यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे काढली असून यातून जनतेचे भले होण्याऐवजी सत्ताधा-यांचे नातेवाईक आणि फायनान्सर यांचेच भले होणार आहे; त्यामुळे ही उधळपट्टी थांबवा अशी मागणी अशी टीका कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली असल्याचे समजते.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कांबळे यांनी असे म्हटले आहे की,महापालिकेतील सत्ताधारी निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांची कामे काढत आहेत. यामधून नागरिकांची कामे होणार नसून निवडणुकीत फ़ंड गोळा करण्याचे काम होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीकडून विकासकामांच्या नावाखाली होणारी उधळपट्टी थांबवावी.
महापालिकेच्या कार्यकक्षेत असलेले सर्वसामान्य लोकांचे असंख्य प्रश्न रखडलेले आहेत. झोपडपट्टीतील समस्या, पाण्याचा अपुरा पुरवठा, ड्रेनेज समस्या, खड्डे, यासारख्या अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. घरकुल योजना निधीअभावी थांबलीे आहे. त्यामुळे हजारो नागरिक निवा-यापासून वंचित राहिले आहेत. त्यासाठीची तरतूद होणे गरजेचे आहे. मात्र स्थायीसमिती स्वतःचे खिसे भरणे आणि ठेकेदार पोसण्याकडे अधिक लक्ष देत आहे; विरोधक हातावर घडी तोंडावर बोट असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्याकडून चुकीच्या कामांना विरोध होत नाही. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली होणा-या भ्रष्टाचाराला आळा घालावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.
नातेवाईक व फायनान्सरच्या कल्याणासाठी सत्ताधा-यांची विकासकामे : बाबा कांबळे
Reviewed by ANN news network
on
१/०८/२०२२ १०:०३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: