राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज माने व त्यांच्या पत्नी सरोज माने तसेच मनसेच्या माजी महिला शहराध्यक्षा निर्मला खैरे यांचा यांचा यामध्ये समावेश आहे. माने यांनी २००७ ची महापालिका निवडणूक काकडे पार्क भागातून तर, त्यांच्या पत्नी सरोज माने यांनी २०१७ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच तिकिटावर लढविली आहे. मनसेच्या माजी महिला शहराध्यक्षा निर्मला खैरे यांनी २००७ ची निवडणूक भाटनगर येथून तर २०१२ व २०१७ ची महानगरपालिका निवडणूक वाकड प्रभागातून लढविली आहे. त्यांनी २०१८ पर्यंत मनसेच्या महिला शहराध्यक्ष पदावर काम केले आहे. सुरज माने यांच्या समवेत चिंचवड गावातील सुधाकर पुरंदरे, अविनाश जाधव, रोहन हिवाळे, शिवाजी सरेकर, सिंध्दू लोणी, सोपान व्हेसे, बंडोपंत आवारे, ऋषिकेश भोसले, कल्पेश घुले, प्रितम गायकवाड, शिवा हेळवार, सुमित भोसले, रूक्षी, पॅडी, शाम जंगले, सुरज, तुषार पाटील, नातू पालांडे, सागर सावंत, प्रसाद लोखंडे, प्रभाकर आव्हाडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. कैलास कदम यांनी पक्षात स्वागत केले. या प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, अभिमन्यू दहितुले, नरेंद्र बनसोडे, सायली नढे, उमेश खंदारे, राजू परदेशी, के हरिनारायणन, नंदा तुळसे, स्वाती शिंदे, विश्वनाथ जगताप, तारीक रिझवी, अन्थोनी झेवियर, नयन पालांडे, विजय ओव्हाळ, माऊली मलशेट्टी, हिराचंद जाधव, किरण नढे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ १०:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".