आळंदीतील शिक्षकांचे आंदोलन १७ व्या दिवशीही सुरूच

आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यू. कॉलेज मध्ये सन २०१२- २०१३ पासून कार्यरत असणा-या विनाअनुदानित शिक्षकांनी २० डिसेम्बर पासून सुरु केलेले धरणे आंदोलन तब्बल १७ व्या दिवशीय कायम राहिले. विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी प्रशालेच्या द्वारात धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात फूट पाडून आंदोलन धडपण्याचा डाव शिक्षकांनी उधळवून लावत आंदोलन सुरुच ठेवले आहे. येत्या दोन दिवसांत मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विनाअनुदानित शिक्षकांनी डी. एड. श्रेणीतील रिक्त जागांवर सेवाज्येष्ठतेने वेतनश्रेणीतील उपशिक्षक पदावर नेमणूक करावी यासाठी गेल्या १७ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी ठिय्या मांडला असून शिक्षकांच्या मागण्या संस्था चालक मान्य करीत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. गेले ९ वर्षे शासनाचा कोणताही पगार न मिळता प्रामाणिक पणे कार्य करूनही संस्था चालक अनुदानितच्या रिक्त पदांवर आपली शासन नियमा प्रमाणे नेमणूक का करत नाही? असा सवाल आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला. तसेच येत्या २ दिवसात मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला.
आळंदीतील शिक्षकांचे आंदोलन १७ व्या दिवशीही सुरूच आळंदीतील शिक्षकांचे आंदोलन १७ व्या दिवशीही सुरूच Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०९:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".