पिंपरी चिंचवड महापालिका ४ हजार २९२ पदे लवकरच भरणार; भरतीप्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचे आयुक्तांपुढे आव्हान
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत लवकरच ४ हजार २९२ पदांची भरती करण्यात येणार आहे.सध्या वादग्रस्त ठरलेल्या राज्यातील विविध भरतीप्रक्रिया पाहता महापालिका भरतीप्रक्रिया स्वत:च राबविणार असल्याचे समजते. परंतु, सध्या महापालिकेत सुरू असलेली भ्रष्टाचाराची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ पाहता ही भरतीप्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त होणार की की भ्रष्टाचाराचा कळस गाठणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेतील किमान ५० ते १०० अधिकारी व कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही. अलिकडेच शासनाने नोकर भरती करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ४ हजार २९२ पदे पिंपरी चिंचवड महापालिकेत भरण्यात येणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे शासनाने सर्व महापालिकांच्या खर्चावर निर्बंध आणत,नोकरभरतीही स्थगित केली होती.आता शासनाने महापालिकांना सरळ सेवेने पदे भरण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. तथापि, प्रशासकीय खर्च ३५ टक्क्याच्या राहण्याची दक्षता आयुक्तांनी घ्यावी, अशीही सूचना नगरविकास खात्याने महापालिकेस दिली आहे.
महापालिकेची निवडणूक वेळेत होणार असल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. तत्पूर्वी प्रशासनाला भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ४ हजार २९२ पदे लवकरच भरणार; भरतीप्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचे आयुक्तांपुढे आव्हान
Reviewed by ANN news network
on
१/०४/२०२२ १०:१७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: