लोणावळा : लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेमध्ये ‘योग आणि मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर तीन दिवसांची १० वी आंतरराष्ट्रीय योग परिषद नुकतीच झाली.
या परिषदेमध्ये देशविदेशातील योगप्रेमी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सहभागी झाले होते. तसेच संस्थेचे अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, योग महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
परिषदेचे उद्घाटन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रीम कोर्टचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण तसेच मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश रमेश धालुका उपस्थित होते. कैवल्यधाम संस्थेचे मानद अध्यक्ष ओमप्रकाश तिवारी यांनी संस्थेचे संस्थापक स्वामी कैवल्यानंद यांच्या विषयी तसेच संस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी संस्थेच्या ३७ वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ सेवेत कार्यरत असलेले दार्शनिक अनुसंधान विभाग प्रमुख प्रोफेसर रवींद्रनाथ बोधे तसेच वित्तीय मार्गदर्शक शरदकुमार सिन्हा यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परिषदेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपायासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबतीत जनजागृती करण्यात आली.
या परिषदेमध्ये मुग्धा पाठक यांचे कथ्थक नृत्य तसेच पद्मश्री प्रल्हाद टिपणीया याचे फबीर अजन आणि कबीर वाणी हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कैवल्यधाम योग संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग परिषद
Reviewed by ANN news network
on
१/०५/२०२२ ०९:५०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: