समर्थ पोलीसठाण्याच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गुन्हेशाखा युनिट १ कडून जेरबंद


पुणे : पुण्यातील भवानी पेठ भागात फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण करून फरशीच्या तुकड्याने गंभीर जखमी केल्याप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. साहिल इरफान दावतखानी (वय २२, रा. ४८१, गुरुवार पेठ, धनगर आळी जवळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक ३ मई २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र मोटारसायकलवरून कॅम्पकडे जात असताना भारत टॉकीज जवळ, दादापीर दर्गा परिसरात चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फरशीच्या तुकड्याने डाव्या हातावर व पाठीवर वार करून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११ (१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी साहिल दावतखानी हा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. युनिट १ चे  अंमलदार प्रमोद जगताप व उमेश शेलार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवार पेठ येथील त्याच्या राहत्या घरी सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धिरज राऊत आणि  अंमलदार प्रमोद जगताप, भुजबळ, आशिष खरात व उमेश शेलार यांच्या पथकाने केली आहे.


  • Labels: Pune Crime Branch, Unit 1, Samarth Police Station, Crime News, Pune Police

  • Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrests a wanted accused absconding for five months in an assault case registered at Samarth Police Station.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #PunePolice #CrimeNews #Unit1 #Arrest

समर्थ पोलीसठाण्याच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गुन्हेशाखा युनिट १ कडून जेरबंद समर्थ पोलीसठाण्याच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गुन्हेशाखा युनिट १ कडून जेरबंद Reviewed by ANN news network on १०/१४/२०२६ ०३:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".