गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कोथरुडमध्ये कारवाई
पुणे :पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या एका पाहिजे आरोपीस जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. भगवान बाळू मरगळे (वय ३०, रा. शिवकल्याण नगर, सुतारदरा, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अभिलेखावरील पाहिजे, फरार व तडीपार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक फौजदार बाळू गायकवाड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. १९६/२०१५ (भादंवि कलम ३७९, ३४) मधील फरार असलेला आरोपी भगवान मरगळे हा आज रोजी कर्वे रोडवरील कोकण एक्सप्रेस हॉटेल परिसरात येणार असल्याची पक्की माहिती होती.
पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या आदेशानुसार अंमलदार बाळू गायकवाड, साईकुमार कारके, साधना पवार, प्रदीप राठोड व अमित गद्रे यांच्या पथकाने तात्काळ कर्वे रोड परिसरात सापळा रचला. दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती खेडकर आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ च्या अंमलदारांनी पार पाडली आहे.
Labels: Pune Crime Branch, Wanted Accused, Kothrud News, Pune Police, Arrest
Search Description:
pune-crime-branch-arrests-accused-absconding-for-12-yearsHashtags: #PuneCrimeBranch #WantedCriminal #PunePolice #Kothrud #CrimeNews
गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कोथरुडमध्ये कारवाई
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२६ ०३:२७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२६ ०३:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: