चार सराईत आरोपी गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद; धनकवडी परिसरातील कारवाई


पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील चार पाहिजे आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. धनकवडी परिसरातील तीन हत्ती चौक येथून या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत असताना, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. ३६५/२०२६ (भा.न्या.सं. कलम ११८(२), १३१, ३५१(२), ३(५), म.पो.का. कलम ३७(१)(३) सह १३५) मधील पाहिजे आरोपी हे तीन हत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी परिसरात थांबल्याची गोपनीय माहिती अंमलदार महेश मंडलिक व उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली.

सदर माहिती वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांना कळविल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पथकाने तातडीने खाजगी वाहनाने जाऊन संबंधित ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी चारही इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी १) सोमनाथ रामकृष्ण कांबळे (वय ३८), २) बापू रामकृष्ण कांबळे (वय ३८), ३) प्रेम सोमनाथ कांबळे (वय १९) आणि ४) साहिल बापू कांबळे (वय २२, सर्व रा. गल्ली क्र. ५२, तळजाई वसाहत, लुंकड शाळेजवळ, पुणे) असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्निल लोहार, शंकर नेवसे आणि युनिट २ च्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.


  • Labels: Pune Crime Branch, Unit 2, Sahakarnagar Police, Pune Crime, Arrest

  • Search Description: Pune Crime Branch Unit 2 arrests four wanted accused in a serious case registered at Sahakarnagar Police Station from Dhankawadi.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #Unit2 #SahakarnagarPolice #PuneNews #CrimeUpdate

चार सराईत आरोपी गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद; धनकवडी परिसरातील कारवाई चार सराईत आरोपी गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद; धनकवडी परिसरातील कारवाई Reviewed by ANN news network on १०/१४/२०२६ ०३:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".