पुणे (विशेष प्रतिनिधी): वाघोली परिसरातील लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पीएमपीएल चार्जिंग स्टेशनजवळ असलेल्या 'इंडीया एटीएम' केंद्रातून लाखो रुपयांची रोकड असलेले एटीएम मशीनच टेम्पोत घालून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे पोलीस गुन्हे शाखेने गजाआड केले आहे
१८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:०० ते ४:३० वाजेच्या सुमारास लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पीएमपीएल चार्जिंग स्टेशनजवळील इंडीया एटीएमच्या गाळ्यात अज्ञात भामट्यांनी टेम्पो आणि मोटारसायकलवरून येत प्रवेश केला होता
शंभरहून अधिक सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे अटक
दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, विनायक साळवे, सारंग दळे, निलेश साळवे, सुहास तांबेकर आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रफुल मोरे यांनी घटनास्थळ व परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले
सीसीटीव्ही विश्लेषणादरम्यान आणि बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक संशयित इसम वाघोलीतील एसटी कॉलनी परिसरात थांबल्याचे निष्पन्न झाले
५ लाखांचा टेम्पो जप्त; साथीदारांचा शोध सुरू
ताबा घेतलेल्या गणेश पवार याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या ओळखीत असलेल्या एका इसमासह आणि मोटारसायकलवरून आलेल्या दोन साथीदारांच्या मदतीने १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री इंडीया एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली
ही कामगिरी अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वीनी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक, वरिष्ठ निरीक्षक बागवान आणि निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने फत्ते केली
Labels:
Pune Crime News,Wagholi ATM Theft,Pune Police Crime Branch,Tejaswini Satpute,Pune PoliceSearch Description:
Pune Police Crime Branch arrests Ganesh Pawar for attempting to steal cash-filled ATM machine using a tempo in Wagholi Pune.Hashtags:
#PuneCrime #Wagholi #PunePolice #ATMTheft #CrimeBranch #BreakingNewsPune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: