आंबेगाव पठार येथील नयन जाधव हत्या प्रकरणातील फरार आरोपी प्रेम जगतापला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक
पुणे (विशेष प्रतिनिधी): आंबेगाव पठार परिसरातील निलगिरी चौक येथे जुन्या भांडणाच्या रागातून १८ वर्षीय नयन सचिन जाधव या तरुणाची धारदार हत्याराने आणि सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारून निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. प्रेम महेश जगताप (वय २२, रा. तुकाई दर्शन, वडगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
४ मे २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात ही धक्कादायक घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाने आरोपी प्रेम जगताप व इतर साथीदारांच्या मदतीने नयन जाधव याच्या डोक्यावर धारदार लोखंडी हत्याराने वार केले आणि सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला जिवे ठार मारले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंगणे रोडवरून आरोपीला घेतले ताब्यात
दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी प्रेम महेश जगताप हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर हे त्याचा शोध घेत होते.
शोध मोहिमेदरम्यान अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी प्रेम जगताप हा वडगाव हिंगणे रोडवरील तुकाईनगर येथे लपून थांबला आहे. बातमी मिळताच पथकाने तुकाईनगर परिसरात सापळा रचून आरोपी प्रेम जगताप याला शिताफीने ताब्यात घेतले व गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव करत आहेत.
ही कारवाई अप्पर आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड,निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक अण्णा दराडे, अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी पार पाडली.
Labels:
Pune Murder Case,Bharti Vidyapeeth Police,Nayan Jadhav Murder,Prem Jagtap Arrested,Pune NewsSearch Description:
Bharti Vidyapeeth Police arrest absconding accused Prem Jagtap in Nayan Jadhav murder case at Ambegaon Pathar Pune.Hashtags:
#NayanJadhavMurder #PremJagtapArrested #BhartiVidyapeethPolice #PuneCrime #CrimeNewsPune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: