मुंबई, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ : मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात १९८५ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या (कलम ३०२) गुन्ह्यातील गेली ४० वर्षे फरार असलेल्या आणि सत्र न्यायालयाने स्थायी वॉरंट (Standing Warrant - Top Priority) जारी केलेल्या ६८ वर्षीय आरोपीला साकीनाका पोलिसांनी शिरूर (जि. पुणे) येथून अटक केली आहे. सुरेश चंदन अडागळे (वय ६८, व्यवसाय- रंगकाम) असे या फरार आरोपीचे नाव असून, २० ऑगस्ट २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
साकीनाका पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १४१/१९८५ कलम ३०२ भा.द.वि. मधील आरोपी सुरेश अडागळे हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देत होता. मूळचा वासुभाई चाळ, राई डोंगरी झोपडपट्टी, बोरीवली (पूर्व) येथील रहिवासी असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या मूळ पत्यावर गेले असता तो तेथे मिळून आला नाही. तेथील जुन्या रहिवाशांकडे चौकशी केली असता आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुरेगाव (ता. श्रीगोंदा) येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने सुरेगाव येथे जाऊन शोध घेतला असता तो तेथूनही पसार झाला होता. स्थानिक नागरिकांकडे अत्यंत बारकाईने केलेल्या विचारपूस आणि तपासादरम्यान आरोपी हा सध्या संकल्प सिटी, रूम क्र. ०७, बिल्डिंग क्र. ०२, रांजणगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास असल्याची पक्की माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने साकीनाका पोलिसांचे पथक रांजणगाव येथे पोहोचले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सुरेश अडागळे याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटुकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाठ, पोलीस हवालदार सांडव, महादेव कुंभार, होळकर, दीपक धुर्वे, पोलीस शिपाई भूषण देवरे आणि बागलाने यांच्या पथकाने पार पाडली आहे.
Labels: Sakinaka Police, Absconding Accused Arrested, Mumbai Murder Case 1985, Crime News Mumbai, Pune News
Search Description: Sakinaka Police arrested 68-year-old Suresh Adagale, absconding for 40 years in a 1985 murder case, from Ranjangaon in Pune district.
Hashtags: #SakinakaPolice #MumbaiPolice #AbscondingArrested #Ranjangaon #CrimeUpdate
हत्येच्या गुन्ह्यात ४० वर्षांपासून फरार असलेल्या ६८ वर्षीय आरोपीला रांजणगावमधून बेड्या
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२६ ०३:४१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: