सैन्याच्या ए.व्ही.एन.एल. मध्ये गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून ३२ लाखांचा गंडा


ॲक्सिस बँकेच्या निलंबित महिला कर्मचाऱ्याला जबलपूरमध्ये बेड्या
 
मुंबई, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ : भारतीय सैन्याच्या जबलपूर येथील आर्मी व्हेईकल निगम लिमिटेड (AVNL) कार्यालयात भाड्याने वाहने लावून देण्याचे आमिष दाखवून ३२ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोनालीकुमारी नावाच्या महिलेला दिंडोशी पोलिसांनी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपासाच्या आधारे १८ ऑगस्ट २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली असून आरोपी महिलेकडून २२ लाख ६४ हजार ५२४ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दिंडोशी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक ३५२/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३४०(२), ३(५)) नुसार अजित सिंग यांनी तक्रार दिली होती. ॲक्सिस बँक जबलपूर येथे नोकरीस असणाऱ्या मोनालीकुमारी हिने तक्रारदारास व्हॉट्सॲपद्वारे ए.व्ही.एन.एल. कार्यालयासाठी विविध वाहने भाड्याने हवी असल्याची बनावट जाहिरात पाठवली होती. जाहिरातीवर विश्वास ठेवून तक्रारदाराने जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत स्वतःच्या वाहनांच्या मंजुरीसाठी आरोपीच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण ३२,६३,००० रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यानंतर वाहने करारावर न घेता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती.

दिंडोशी पोलिसांनी बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून तपास केला असता आरोपी मोनालीकुमारी हिनेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. १८ ऑगस्ट रोजी जबलपूर येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान निष्पन्न झाले की, आरोपी महिलेला ॲक्सिस बँकेतून आधीच निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध जबलपूर येथेही इतर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तिच्या खात्यावरून २२ लाख ६४ हजार ५२४ रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड जप्त केले आहे.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेंद्र शिंदे, निरीक्षक शरद सुर्वे, सहाय्यक निरीक्षक अमित खुटवड, अंमलदार अमोल पाटील व महिला अंमलदार मेघना भालेराव यांच्या पथकाने केली आहे.


  • Labels: Dindoshi Police, Crime News Mumbai, Online Scam, Army Vehicle Nigam Limited, Cyber Crime

  • Search Description: Dindoshi police arrested suspended Axis Bank employee Monalikumari from Jabalpur for defrauding Rs 32.63 lakh on the pretext of hiring vehicles for AVNL.

  • Hashtags: #DindoshiPolice #MumbaiCrime #OnlineFraud #Jabalpur #CyberCrime


सैन्याच्या ए.व्ही.एन.एल. मध्ये गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून ३२ लाखांचा गंडा सैन्याच्या ए.व्ही.एन.एल. मध्ये गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून ३२ लाखांचा गंडा Reviewed by ANN news network on ८/२३/२०२६ ०३:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".